दिल्लीच्या हवेत विषाची भर, प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात!
दिल्ली:
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा अनुसार 17 नोव्हेंबर, 24 सकाळी 7 वाजता दिल्लीची हवा घातक ठरवण्यात आली असून हवेची शुद्धता म्हणजेच AQI ( AIR QUALITY INDEX) 428 झाला असे जाहीर करण्यात आले आहे. ऐन थंडीत प्रदूषणाचे धुके दिल्लीत अती वेगाने पसरत असून ही चिंतेची बाब ठरत आहे. दिल्लीतल्या बावाणा स्टेशन चा AQI अती घातक असा 471 झाला आहे. याच मुळे लहान थोरांना श्वसनाचे त्रास संभवु शकतात त्याच अनुषंगाने शाळा कॉलेजेस ना काही दिवस सुट्टी देणं सरकारला अनिवार्य झाल आहे! दिल्लीतले प्रदूषण ही दिवसेंदिवस चिंतेची गोष्ट ठरत आहे आता यावर सरकार कोणता नवीन तोडगा काढेल हे पाहण्याजोग आहे