वाढलेल्या ' टक्केवारीचा ' होईल का भाजप महायुतीला फायदा?

२० नोव्हेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यात विधासभेच मतदान मोठ्या उत्साहात झाल्याचं दिसून येतंय. याचं कारण मुळात अस की या वेळीस मतदानाचा टक्का वाढलेला दिसतोय. यंदा ही गडचिरोलीत सर्वोच्च ६९% ते ७४% मतदान झाल्याचं कळतंय तर मुंबई शहरात ४९% पर्यंत सर्वात कमी मतदान झाल्याचं कळतंय. पण चांगली बाब ही की संपूर्ण राज्याचं मतदान ६५.२% झालंय जे की १९९५ नंतरच सर्वोच्च मतदान आहे! मागील इलेक्शन ची जर टक्के वारी काढली तर हया वेळी महाराष्ट्रात मतदान संघेत सरासरी ४ टक्के मतदान वाढले. हया वेळी मतदान वाढण्याची मूळ कारण लाडकी बहिण योजना आणि मराठा आरक्षण लोकांकडून सांगितल्या जात आहे.
या वाढलेल्या मतदानाचा फायदा थेट भाजपला होईल असं म्हणणं भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच आहे! महायुती का महविकासआघाडी का अजून कुठले फोडाफोडीचे खेळ जनतेला बघायला मिळतील हे मात्र २३ नोव्हेंबर नंतरच कळेल.