बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ची पर्थ मध्ये सुरुवात!

२२ नोव्हेंबर २०२४ पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ची म्हणजेच भारत वि. ऑस्ट्रेलिया ची सुरुवात ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात झाली आहे. सकाळी ७:५० पासून पहिला सामना सुरू झाला. ५ कसोटी सामन्यांची ही लढत मोठी रंजक असणार आहे. पहिला सामना २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर पर्थ मध्ये तर दुसरा ६ डिसेंबरला ऍडीलेड, तिसरा 14 डिसेंबर ब्रिस्बेन, चौथा २६ डिसेंबर मेलबर्ण आणि पाचवा 3 जानेवारी सिडनी मध्ये अशी ही पाच कसोटीची मालिका असून क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात हजर नसल्यामुळे फक्त पहिल्या सामन्यात भारतासाठी जसप्रीत बुमरहा हा कर्णधार असणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध कडवा पराभव पत्करून भारत कांगारुंच्या जमिनीवर काय कामगिरी बजावतो यावर संपूर्ण क्रिकेट जगताच लक्ष लागून राहिलं आहे.