महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: मतदानाची नोंद

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: मतदानाची नोंद

राज्यात ६५.११% मतदान पार, गेल्या ३० वर्षात सर्वाधिक, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याने किती टक्के मतदान केले….

बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक राज्यभरात पार पडली. जनतेने करोडोंच्या संख्येने मतदान करत पुढील पाच वर्षात राज्य कोणाच्या हातात जाणार याबद्दल आपले मत मतदानाच्या निमित्ताने मांडले. आलेल्या आकडेवारी नुसार राज्यभरात जवळपास ६५.११% जनतेने मतदान केल्याचे समोर आले आहे. 

हा आकडा समाधानकारक नसला तरीही, गेल्या ३० वर्षातील विधानसभा निवडणुकीतील हा सर्वाधिक म्हणून समोर आलेला आहे. १९९५ च्या निवडणुकीत एकूण ७१.६९% मतदान महाराष्ट्राच्या जनतेने केले होते.  इलेक्शन कमिशन च्या आकड्यांनुसार हा आकडा २०१९ विधानसभा आणि २०२४ लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्तच आहे. 

दरवेळी प्रमाणे शहरी पेक्षा ग्रामीण भागातच मतदानाचे प्रमाण जास्त दिसून आले असून, मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे मधून निराशाजनक टक्केवारी समोर आली. 

जिल्हानिहाय मतदान %

अहमदनर - ७१.७३
अकोला - ६४.९८
अमरावती - ६५.५७
औरंगाबाद - ६८.८९
बीड - ६७.७९
भंडारा - ६९.४२
बुलढाणा - ७०.३२
चंद्रपूर - ७१.२७
धुळे - ६४.७०
गडचिरोली - ७३.६८
गोंदिया - ६९.५३
हिंगोली - ७१.१०
जळगाव - ६४.४२
जालना - ७२.३०
कोल्हापूर - ७६.२५
लातूर - ६६.९२
मुंबई शहर - ५२.०७
मुंबई उपनगर - ५५.७७
नागपूर - ६०.४९
नांदेड - ६४.९२
नंदुरबार - ६१.१५
नाशिक - ६७.७५
उस्मानाबाद - ६४.२७
पालघर - ६५.९५
परभणी - ७०.३८
पुणे - ६१.०५
रायगड - ६७.२३
रत्नागिरी - ६४.५५
सांगली - ७१.८९
सातारा - ७१.७१
सिंधुदुर्ग - ६८.४०
सोलापूर - ६७.३६
ठाणे - ५६.०५
वर्धा - ६८.३०
वाशीम - ६६.०१
यवतमाळ - ६९.०२