"कौन एक , कौन सेफ"? म्हणत राहुल गांधींची पत्रकार परिषद! 

"कौन एक , कौन सेफ"? म्हणत राहुल गांधींची पत्रकार परिषद! 

१७ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईत राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रात प्रचाराचया शेवटच्या दिवशी राहूल गांधींनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्दे तर मांडलेच पण सोबतच मोदी आणि अडाणी यांच्यावर जहरी टीका देखील केली आहे. मोदीच्या "एक हैं तो सेफ है" या वक्तव्यावर राहुल गांधींनी पलटवार केला. त्यांनी एका तिजोरीतून दोन चित्र काढले. त्यातलं एक मोदी - अडाणी चं व दुसरं धारावीच! ही दोन्ही चित्र दाखवीत राहुल गांधी म्हणाले की जर मोदी अडाणी 'एक' असतील तरच सरकार  ' सेफ ' आहे अन् धारावीच भविष्य धोक्यात. महाराष्ट्रतून  7 लाख कोटींचे प्रकल्प बाहेर गेले आणि किती रोजगार महाराष्ट्राकडून हिरावून घेतले यावर गांधींनी भाष्य केले. सोबतच काही योजनां देखील राहुल गांधींनी स्पष्ट केल्या. प्रचाराचा शेवटच्या दिवसाची सुरुवात जोराने झाली असून अजून काय पाहायला मिळतंय यावर महाराष्ट्राचं लक्ष असेलच

Omkar Jadhav You live your perception! A Media and Communication student at Fergusson College , Pune.